बकूळ-दंतरोगावर उपयुक्‍त औषध

दात हलण्यावर

दातांच्या रोगांवर बकूळ हे अत्यंत उत्तम औषध आहे. दात हालत असल्यास बकुळीच्या सालीचे चूर्ण लावून दात घासावेत त्यामुळे दात घट्ट बसतात. दातांचे हालणे कमी होते. बकुळीच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्या असता, म्हणजे वारंवार या काढ्याच्या चुळा भरून टाकल्यास कसेही कोणतेही दात हालत असल्यास एका आठवड्यात ते घट्ट होतात व

सुजेवर

कोणत्याही प्रकारच्या सूजेवर बकुळीची साल औषधी आहे. ही साल जर गंधासारखी पाण्यात उगाळून त्याचा लेप लावला, तर कोणत्याही प्रकारची आलेली सूज बरी होते.

कडकीवर

बकूळ थंड असते. चांगली पिकून पिवळी झालेली बकुळीची गोड लागणारी 10-12 फळे रोज नित्यनेमाने जर खाल्ली तर उष्णतेचे विकार कमी होतात; तसेच अंगातील कडकी कमी होते.

लघवीच्या विकारांवर

मूत्रविकार अनेक असतात. यात लघवीला सारखे थोडे थोडे होणे, उन्हाळी लागणे, लघवी साफ न होणे, फेसाळलेली लघवी होणे असे अनेक विकार येतात. अशा वेळी बकुळीचे सरबत प्यावे. ते आरोग्यास हितकर असते.
बकुळीचे सरबत: चांगली पिकलेली बकुळीची 30-32 फळे घ्यावीत. 2 भांडी पाणी घेऊन या पाण्यात ही फळे नीट कुस्करावी नंतर त्यात 55 ग्रॅम साखर घालून ती विरघळवावी. मग मिश्रण गाळून घ्यावे. सरबत प्यायल्याबरोबर तासादोनतासात लघवी साफ होते.

मूतखड्यावर

मूतखड्यात लघवीची जळजळ होऊन थोडे थोडे लघवीस होत असते, अशा वेळी बकुळीच्या फळांचे सरबत करावे. सरबत करताना बकुळीची फळे पाण्यात कुस्करून खडीसाखर घालून हे सरबत तयार करावे. असे बकुळीचे सरबत नित्य सारखे दोन महिने घेत गेल्यास मूतखडा गळून पडतो.

डोकेदुखीवर

बकुळीच्या फुलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण जर तपकिरीसारखे नाकात ओढल्याने तत्काळ आपली डोकेदुखी थांबेल. फक्‍त चूर्णाची वस्त्रगाळ पूड करावी. मनःशांतीसाठी व रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी बकुळीच्या सुगंधी फुलांचे गजरे केसांमध्ये माळावेत. हातांमध्ये गुंफावेत ज्यामुळे मनाला शांती प्राप्त होईल. आनंदी जीवनात सुगंध बल प्रदान करतो. मग आपली रोगप्रतिकारक शक्‍ती आपोआप वाढते.
अशाप्रकारे बकूळ हा वृक्ष अत्यंत औषधी आहे. दारी बकुळीचे झाड हे हवेच.

फणी निवडुंग

महाराष्ट्रामध्ये साठ सत्तर वर्षांपूर्वी, फण्या निवडुंगाची अमाप बेटे सर्वत्र होती. त्यानंतर निरनिराळी कीड झाडावर पडत गेल्यामुळे फण्या निवडुंग जवळजवळ नाहीसा झाला आहे. याचे दांडे तळहातासारखे मोठे, चपटे व पातळ असतात. फण्यामध्ये सांधे असून फण्यांवर काटे, फुले व फळे येतात. यांना पाने येत नाहीत. पिकलेली फळे गडद तपकिरी किंवा लाल चुटूक रंगाची असतात. चवीला स्वादीष्ट, गोड व चिकट असणाऱ्या फळांवर बारीक तुसासारखा काटा असतो. वापरण्याआगोदर फळे फुफाट्यात भाजून घ्यावी लागतात.

कफ व अंगाचा दाहावर

पक्क फळात साखरेसारखा मोठ्या प्रमाणात पदार्थ असतो. फळांचा रस कफ व अंगाचा दाह यावर विशेष काम करतो.

वारंवार येणाऱ्या खोकल्यावर

लहान मुले व वृद्ध यांच्या रात्री वारंवार येणाऱ्या खोकल्यावर निवडुंगाच्या बोंडाचा रस अत्यंत उपयोगी आहे.

पित्तस्राव वाढविण्याकरिता

शरीरातील पित्तस्राव वाढविण्याकरिता फळांचा रस उपयोगी पडतो. गरोदर स्त्रियांना हे दिल्यास काही त्रास होत नाही. दमा, डांग्या खोकला, कमी पोषण, या करिता “नवजीवन’ हे औषध प्रसिद्ध आहे. पंचांगाचा क्षार लघवी निर्माण करणारा व वातानुलोमन करणारा आहे. तसेच जीर्ण आमवात, संधिवात व सुजेवर मुळांचा काढा पोटात देतात. बाहेरून चिकाचा लेप लावतात.

Leave a Comment