‘सर्व देवी-देवतांनी चांगलं करण्यासाठी मोदींची नेमणूक केलीय’ – गायक सुरेश वाडकर

Singer Suresh Wadkar । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. दरम्यान, 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना नुकतंच प्रदान करण्यात आला आहे.

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. तर, दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते ‘अशोक सराफ’ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. । Singer Suresh Wadkar

दरम्यान, आज गायक सुरेश वाडकर यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले असून त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला.

त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, असे स्पष्ट केले. त्यांना मराठा आरक्षणावरुन राज्यात दुफळी माजत असल्याबद्दल विचारले. । Singer Suresh Wadkar

तेव्हा वाडकर यांनी म्हटले की, साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी बसवलंय आहे. मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार आहे. सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केलीय. ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केली आहे’. असं सुरेश वाडकर यावेळी म्हणाले.

सुमधुर गाण्यांना दिला आवाज…. । Singer Suresh Wadkar

त्यांनी अनेक चित्रपटांमधील आपला आवाज दिला आहे. त्यात ‘ओंकारा’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘रंगीला’, ‘माचीस’ इत्यादींचा समावेश आहे. सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला.

त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी त्यांचे गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचे औपचारिक धडे घ्यायला सुरुवात केली होती. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गायली आहे.

अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. 2011मध्ये त्यांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला आहे. । Singer Suresh Wadkar