निवडणुकीआधी बीडमध्ये इनोव्हा गाडीत सापडली एक कोटींची रोकड

बीड – देशभरात लोकसभा निवडणुकीच्‍या पाश्‍र्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील कोट्यावधी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर एका इन्होवा वाहनातून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी कॅश पोलिसांनी सापडली. पण ही कोट्यावधींची रक्कम छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून काढली असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु, ही रक्कम खरंच छत्रपती संभाजीनगरमधल्या शाखेतून काढली गेली की नाही, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पण ही रक्कम बीड येथील व्दारकादास मंत्री बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात होती, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.