पुणे जिल्हा | क्रिटेक्नोवा २०२४ उपक्रमांत ११२० विद्यार्थ्यांचा सहभाग

माळेगाव, (वार्ताहर) – माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित “क्रिटेक्नोवा २०२४ ” टेक्निकल सिंपोजियममध्ये महाविद्यालयातील एकूण ११२० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पनेचा वापर करुन समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःमधील स्किल डेव्हलप करण्यासाठी नेहमी कार्यक्षम व अपडेट राहणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद केले. या कार्यक्रमामध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशन, सर्किट मेकिंग, ब्रिज मेकिंग, पोस्टर कॉम्पिटिशन, रील मेकिंग कॉम्पिटिशन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलत असताना सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कारण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. संग्राम जाधव व प्रा. संजय थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, संचालक मंडळ,

विश्वस्त रवींद्र थोरात, वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे,गणपत देवकाते व निमंत्रित सदस्या सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.