खंडणीप्रकरणी 15 संशयित जेरबंद

सातारा – हॉटेल व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून, तब्बल 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दरोडा टाकणारी 15 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी जेरबंद केली आहे. अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे, अभिजित शिवाजी मोरे (दोघे रा. गंगापुरी, वाई), अरिफ सिकंदर मुल्ला (वय 43), सागर तुकाराम मोरे (वय 34), अभिमन्यू शामराव निंबाळकर (वय 25), सूरज मुन्ना शेख (वय 21), संदीप सुरेश पवार (वय 23), क्षितिज ऊर्फ सोन्या वीरसेन जाधव (वय 19), गिरिश दिलीप गवळी (वय 25), प्रज्वल बाळकृष्ण पवार (वय 23), प्रतीक बाळकृष्ण पवार (वय 28), रत्नाकर मधुकर क्षीरसागर (वय 28), नीलेश उमेश मोरे (वय 25, सर्व रा. भुईंज, ता. वाई), अमोल महामूलकर (रा. महामूलकरवाडी, ता. वाई), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मेणवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यावसायिकाला 1 जून रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून, त्याच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याला ठार मारण्याची धमकी देत, त्याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष पवार, सपोनि रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्‍वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या तपास पथकांनी संशयितांना अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि तांत्रिक विश्‍लेषण करून, ही कारवाई केली. या संशयितांना भुईंज, वाई, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करत आहेत.