अहमदनगर जिल्ह्यात 16508 करोनाबाधित

नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 13054
उपचार सुरू असलेले रूग्ण : 3228
आजपर्यंतचे मृत्यू : 226
एकूण रूग्ण संख्या : 16508

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने तब्बल 16508 ची संख्या गाठली. अन्य जिल्ह्याच्या मानाने नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येतील ही वाढ धोकादायक पातळी ओलांडत असल्याचे स्पष्ट करत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज 445 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 13 हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 54 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 79.08 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 603 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3228 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 115, अँटीजेन चाचणीत 288 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 200 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 82, संगमनेर 03, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 02, कॅन्टोन्मेंट 02, पारनेर 07, राहुरी 03, कोपरगाव 06, जामखेड 01, कर्जत 01 आणि मिलीटरी हॉस्पिटल 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 288 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 50, संगमनेर 07, राहाता 25, पाथर्डी 16, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 14, कॅंटोन्मेंट 06, नेवासा 20, श्रीगोंदा 14, पारनेर 16, अकोले 07, राहुरी 33, शेवगाव 12, कोपरगाव 25, जामखेड 12 आणि कर्जत 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 200 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 112, संगमनेर 07, राहाता 08, पाथर्डी 06, नगर ग्रामीण 30, श्रीरामपूर 07, कॅंटोन्मेंट 02, नेवासा 11, श्रीगोंदा 01, पारनेर 03, अकोले 02, राहुरी 03, शेवगाव 01, कोपरगांव 03 जामखेड 02 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 445 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 184, संगमनेर 37, राहाता 17, पाथर्डी 17, नगर ग्रा.13, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 04, नेवासा 24, श्रीगोंदा 11, पारनेर 20, अकोले 16, राहुरी 07, शेवगाव 21, कोपरगाव 24, जामखेड 13, कर्जत 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Comment