राज्य मार्गासाठी 17 कोटी मंजूर

मलकापूर-नांदलापूर-कोकरुड

कराड – मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतून गेलेला मलकापूर-नांदलापूर-कोकरुड हा राज्य मार्ग क्र. 144 चे रुंदीकरण, मजबूतीकरण व आरसीसी गटर्ससाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारशीनुसार सुमारे 17 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले, सन 2011 साली माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष निधीतून या रस्त्यासाठी सुमारे 12 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता व या निधीतून म्हसोबा मंदिर परिसरामध्ये रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. तसेच या निधीतून मार्केटयार्ड ते लक्ष्मीनगर, गावठाण पर्यंतचे आरसीसी गटरचे काम 90 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याबरोबरच सदर रस्त्यालगतची पाणी पुरवठा पाईप लाईन व विद्युत पोल स्थलांतरीत करणेत आलेले आहेत. या दरम्यान मलकापूर शहर सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम व स्थानिक अडचणीमुळे सदरचे काम प्रलंबित होते.

पुर्नमुल्यांकन करुन सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प यांचेकडून जाहिर निविदेद्वारे सदरचे काम पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. शेती उत्पन्न बाजार समिती ते गोकाक ऑफिस रस्त्यासाठी 6.90 कोटी, दिनकर फुके ते स्मशानभूमी रस्ता 3 कोटी, स्मशानभूमी, गाव विहीर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता 6 कोटी, गोकाक ते दिनकर फुके सरस्वती संकुल यांचे घर असे एकूण 17 कोटीचा निधी मंजूर करणेत आलेला आहे. सदर निधी मंजूर व्हावा. सदर निधी मंजूर झाल्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 या मार्गावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेता हा रस्ता पुर्ण झाल्यानंतर मलकापूर शहरातील

नागरिकांना हा रस्ता रहदारीसाठी सोयीचा होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्री, तसेच तात्कालिन अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आमदार सतेश उर्फ बंटी पाटील, आमदार आनंदराव पाटील यांनी या कामाचा पाठपुरावा करुन निधी मंजूरीसाठी सहकार्य केले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment