nagar | शिबिरात १९० आशासेविका सहभागी

श्रीरामूपर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर रोटरी क्लब व रोटरी क्लब, नगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण शिबिरात १९० आशासेविका सहभागी झाल्या होत्या. आशासेविका यांना एक पुस्तक व सर्टिफिकेट भेट देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे यांनी दिली.

श्रीरामपूर रोटरी क्लब व रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्सव मंगल कार्यालय येथे आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभ्यंकर बोलत होत्या.

व्यासपीठावर रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे, मुग्धा अभ्यंकर, रोटरी क्लब अध्यक्ष हरीश नय्यर,सेक्रेटरी कटारिया, रवी निकम, विनोद पाटणी, डॉ.अजित घोगरे, डॉ.मोहन शिंदे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाग्येश कोठावळे यांनी केले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.