सातारा जिल्ह्यात 264 जणांचे अहवाल करोनाबाधित

सातारा -जिल्ह्यात काल सोमवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 264 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून आज मंगळवारी संध्याकाळपर्यंत 445 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

आजच्याया करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 2 (9924), कराड 24 (38684), खंडाळा 3 (14023), खटाव 43 (25241), कोरेगाव 17 (21647), माण 24 (17527), महाबळेश्‍वर 2 (4642), पाटण 4 (10065), फलटण 78 (36482), सातारा 52 (50753), वाई 7 (15614) व इतर 8 (2068). जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख 46 हजार 670 इतकी झाली आहे. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6049 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.