अमेरिकेत आठवडाभरात 2,700 विमान उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन – अमेरिकेत खराब हवामानामुळे विमान उड्डाणे रद्द होण्याचा प्रकार सुरूच राहिला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.

खराब हवामानाबरोबरच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांची घटलेल्या संख्येमुळेही मोठ्या संख्येमुळे विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिकेत एकूण 2,723 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. जगभरात एकूण 4,698 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यापैकी निम्मी विमान उड्डाणे एकट्या अमेरिकेतच रद्द करावी लागली होती, अशी माहिती विमान प्रवासाची माहिती देणाऱ्या “फ्लाईट अवे’ या वेबसाईटने दिली आहे.

याशिवाय देशांतर्गत विमानांची उड्डाणे उसीराने होणेही सुरूच राहिले आहे. अमेरिकेत देसांतर्गत प्रवास करण्यासाठीची 5,993 विमानांची उड्डाणे शनिवारी उशीरा झाली होती. तर जगभरात 11,043 देशांतर्गत विमानांची उड्डाणे उसीरा झाली होती. खराब हवामान आणि ओमायक्रॉनचा फटका अमेरिकेतील स्कायवेस्ट या विमान कंपनीला सर्वाधिक बसला आहे.

या कंपनीला 23 टक्के विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. शिकागो विमानतलावरील विमानसेवा सर्वाधिक विस्कळीत झाली होती. विमान कंपन्यांमधील वैमानिक, सहायक, कर्मचारी आणि अन्य तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे विमान उड्डाणे नियमितपणे होणे अवघड झाले आहे.