पिंपरी | देऊळगावराजे आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजनाच्या 36 शस्त्रक्रिया

देऊळगावराजे, (वार्ताहर)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण योजनेचे एकूण 36 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अविनाश अलमवार यांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी फलटण येथीलसर्जन कदम याना बोलावण्यात आले होते.

तसेच त्याच्या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अविनाश आल्लमवार आणि स्नेहा शिंदगणे, कोमल गावडे, अजयकुमार पोतन, मयूर वाहुळे, तनुजा कुर्‍हाडे, सुप्रिया तलवारे, आरोग्य सेविका निर्मला म्हांकाळे, संगीता नगरे, निशा राउत, निशा ताटे, माया काळे, संदेशा परदेशी, मेघा रणधीर,

आरोग्य सेवक सीताराम कोकडे, गोपाळ ताटे, शरद दिवेकर, अक्षय इधाते, संदीप कोल्हे, पद्माकर नकुले, सुनील ससाणे, औषध अधिकारी रुक्साना तडवी, गट प्रवर्तक अनिता आवचर, लॅब सहायक दीप्ती पलांगे, अमोल वाघमारे, रुग्णवाहिका चालक गणेश कोल्हे व सर्व आशा टीम पहाटे 5पासून शस्त्रक्रियेसाठी हजर होते. सध्या वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे अवकाळी वादळी वार्‍यासह पाऊस झाल्यामुळे रात्रभर विजेचा लपंडाव चालू होता, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शस्त्रक्रिया शिबिर व्यवस्थित पार पडले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या योग्य नियोजन व इमारतींच्या स्वच्छ्ता व इतर सोयीसुविधांचा विचार करता शस्त्रक्रियेसाठी इच्छुक महिला लाभार्थी संख्या शेकड्याच्या घरात आहे; परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची बेडक्षमता लक्षात घेता ठराविक आकडा या कॅम्पमध्ये घेण्यात आला व पुढील महिन्यात उरलेल्या रुग्ण लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल. -डॉ. अविनाश आल्लमवार, वैद्यकीय अधिकारी देऊळगाव राजे