नगर | धनादेश न वटलयाने कर्जदारास पाच महिन्याची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेकडुन घेतलेलया कर्ज फेडीसाठी दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन कर्जदार विनोद मदनलाल उणेचा (रा. गोंधळे गलली, माळीवाडा, अ. नगर) यांना पाच महिन्याची शिक्षा व २ लाख ४ हजार रुपयांचा दंड झालयाची माहिती संस्थेकडुन न्यायालयात काम पाहणारे संजय शांतीलाल मुनोत व अॅड. पी. एम. भंडारी यांनी दिली.

भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्जदार विनोद मदनलाल उणेचा यांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. थकीत कर्ज फेडीसाठी त्यांनी पतसंस्थेस धनादेश दिला होता. हा धनादेश पतसंस्थेने त्यांच्या खात्यात वटण्यासाठी भरला असता तो चेक वटला नाही. म्हणुन पतसंस्थेने अ.नगर, जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली.

या खटलयाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नि-हाळे यांच्या समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून संजय शांतीलाल मुनोत यांची साक्ष नोंदविण्यात आली. व कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आला. दोन्ही बाजु ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीस दोषी धरुन पाच महिन्याची कैद व २ लाख ४ हजारांचा दंड केला आहे. दंड न भरलयास १ महिना कैद शिक्षा सुनावली आहे. महेश पतसंस्थेतर्फे अॅड. पी. एम. भंडारी यांनी काम पाहिले.