मानवी तस्करांपासून 59 मुलांची सुटका; 5 जणांना अटक

मुंबई – मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी बिहार-पुणे ट्रेनवर कारवाई करून 59 मुलांची मानवी तस्करांपासून सुटका केली. यात कारवाईत पाच आरोपींना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या मुलांना महाराष्ट्रातील अनुक्रमे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या भुसावळ आणि मनमाड येथे दानापूर-पुणे स्पेशल एक्‍स्प्रेस ट्रेनमधून सोडवण्यात आले आहे. विश्वसनीय माहितीच्या आधारे, स्थानिक पोलिसांसह आरपीएफ आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भुसावळ स्टेशनवर तपासणी केली.

आठ ते 15 वर्षे वयोगटातील एकूण 29 मुलांची सुटका करण्यात आली. नंतर, आणखी एका रेल्वेत याच वयोगटातील 30 मुलांची मनमाड येथे रेल्वेतून सुटका करण्यात आली. त्यानंतर मानवी तस्करीच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले आहे.