पुणे | मध्य प्रदेशातील तरुणाकडून ७ दुचाकी जप्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडक पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५, रा. स. नं. १२०, किष्किंधानगर, कोथरूड, मूळ जिल्हा- उमरीया, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

तो पुण्यात मिक्सर दुरुस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलिसांत वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, हॉन्डा स्प्लेंडर, होंडा पॅशन, टीव्हीएस विक्टर अशा एकूण ०७ दुचाकी जप्त करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीप्रकरणी गस्त वाढवली होती, तसेच चोरीस गेलेल्या एका पल्सर गाडीसंदर्भात तपास सुरू होता. दरम्यान, पोलीस अंमलदार हर्पल दुडम, प्रमोद भोसले व अक्षयकुमार साबळे यांना खबर मिळाली, की साधारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रभूषण चौकातून गाडी चोरणारी व्यक्ती गाडीसह भांडेआळी रविवार पेठ येथे थांबली आहे.

पथकाने तातडीने तेथे जाऊन दुचाकीसह उभ्या असलेल्या साहूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून २ लाख ३५ हजार रुपयांच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराय राऊत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाचळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, लखन डावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव यांच्या पथकाने केली