ढाक्‍यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात 7 ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्‍यामध्ये आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 7 जण ठार झाले आहेत.

ढाक्‍यातील मोघबझार या भागात झालेल्या या स्फोटात सात इमारती आणि तीन प्रवासी बसचे नुकसान झाले. आतापर्यंत या स्फोटात सात लोक ठार झाल्याचे आम्हाला समजले असल्याचे ढाक्‍याचे पोलिस आयुक्त शफीक इस्लाम यांनी सांगितले.

गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे हा घडला असावा असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मात्र प्रत्यक्ष घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर अधिक सविस्तर माहिती दिली जाईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल सज्जाद हुसेन यांनी सांगितले.