Ayushman Bharat : देशभरात 70 हजार आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रे स्थापन

नवी दिल्ली, दि. 21 – देशात येत्या 31 मार्च पर्यंत 70 हजार आयुष्यमान भारत केंद्रे स्थापन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले होते. ते उद्दीष्ट वेळेच्या आधीच पुर्ण झाले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले.

आज देशातील 41 कोटी 35 लाख नागरीक आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राशी जोडले गेले आहेत अशी माहितीही या मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. या केंद्रांच्यावतीने नागरीकांना प्राथमिक आरोग्य सेवा दिल्या जातात. एप्रिल 2018 मध्ये या केंद्रांच्या स्थापनेला सुरूवात करण्यात आली. आता अल्पावधीतच 70 हजार केंद्रे स्थापन करण्याचा टप्पा गाठला गेला हा आरोग्य विभागाच्या कार्यातील एक महत्वाचा क्षण आहे.

देशभरात सध्या जी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू आहेत त्यांचे रूपांतर आयुष्यमान भारत वेलनेस सेंटर मध्ये केले जात आहे. डिसेंबर 2022 पर्यंत अशी सुमारे दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आयुष्यमान भारत वेलनेस सेंटर मध्ये परावर्तीत केली जाणार आहेत.

Leave a Comment