‘तुम्ही उपाशी राहिलात तर देवाला भेटाल…’ देवाला भेटायच्या ओढीत 73 जणांचा मृत्यू ‘जाणून घ्या’ नेमकं काय घडलं

आफ्रिकन देश केनियामध्ये एका धर्मगुरूने येशूची भेट घालून देण्याच्या नावाखाली 73 जणांची हत्या केली. ख्रिस्ती धर्मगुरूने लोकांना उपाशी राहिल्यावरच येशूला भेटता येईल असे सांगितले होते. वास्तविक चर्चच्या एका धर्मगुरूने लोकांना सांगितले होते की, जर तुम्ही उपाशी राहिलात तर तुम्ही येशूला भेटाल आणि स्वर्गातही जाऊ शकाल.

धर्मगुरूंच्या सांगण्यावरून लोक उपाशी राहू लागले, त्यामुळे अनेक लोक मरण पावले. किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलात लोकांचे मृतदेह सापडले. केनियातील शाकाहोला जंगलातून पोलीस लोकांचे मृतदेह बाहेर काढत आहेत. आतापर्यंत 73 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी धर्मगुरूंसह पाच जणांना अटक केली आहे. तीन दिवसांपासून लोकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत.

हे धर्मगुरू महाशय केनिया देशाच्या किलिफी काउंटी प्रदेशातील शाकाहोला गावात गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च चालवत होते. येशूची ओळख करून देण्याच्या नावाखाली लोकांना मारणाऱ्या या धर्मगुरूंचे नाव पॉल माकेनजी न्थेंगे आहे. असे म्हणतात की धर्मगुरू चर्चमध्ये लोकांना प्रार्थनेसाठी बोलावत असे. त्याने येथे येणाऱ्या लोकांना सांगितले की जर त्यांनी खाणे पिणे सोडून उपवास केला असेल तर तो त्यांची येशूशी ओळख करून देईल. यानंतर अनेक लोक उपाशी राहू लागले, त्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

असा झाला खुलासा
वास्तविक, लोकांनी धर्मगुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि जेवण बंद केले. ते सर्वजण एकाच घरात एकत्र राहू लागले. उपासमारीने लोकांची प्रकृती हळूहळू ढासळू लागली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे छापा टाकला. येथे पोलिसांनी अनेकांना वाईट अवस्थेत बाहेर काढले. पोलिसांनी लोकांना रुग्णालयात दाखल केले, जिथे अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मगुरूने अनुयायांना आमरण उपोषण करण्यास प्रवृत्त केले होते. आतापर्यंत पोलिसांनी शकहोला जंगलातून 73 मृतदेह बाहेर काढले आहेत. यासोबतच पोलिसांनी अनेक कबरींचीही ओळख पटवली आहे.

मालिंदी उप-काउंटी पोलिस प्रमुख जॉन केंबोई म्हणाले की, पास्टर पॉलच्या जमिनीवर अजूनही अनेक कबरी खोदल्या जात आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, या धर्मगुरूला 14 एप्रिल रोजी जादूटोणा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चमध्ये भुकेने चार जणांचा मृत्यू झाला होता.

पास्टर पॉल माकेंजी न्थेंगेला आणखी काही दिवस कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. धर्मगुरूच्या अनुयायांच्या मृत्यूचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.