Boat Capsize Incident : इंग्लिश खाडीत 80 शरणार्थ्यांना वाचवण्यात यश…

लंडन – फ्रान्समधून इंग्लिश खाडी ओलांडताना एका लहान बोटीला अडचण आल्याने सुमारे ८० स्थलांतरितांची ब्रिटीश अधिकाऱ्यांनी गुरुवारी समुद्रात सुटका केली. (80 migrants rescued in English Channel after boat capsizes) या घटनेनंतर दोन हेलिकॉप्टर पाठवली तर रॉयल नॅशनल लाइफबोट संस्थेने लाईफबोट पाठवल्या. या सर्वांना जमिनीवर परत आणल्यानंतर या सर्व लोकांचा शोध आता संपला आहे, असे ब्रिटीश तटरक्षक दलाने सांगितले.

इंग्लिश खाडी धोकादायकपणे ओलाडणाऱ्या स्थलांतरितांना कसे थांबवायचे हा ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा मुख्य मुद्दा आहे. हुजूर पक्षाच्या सरकारने स्थलांतरितांना रोखण्याबाबत कठोर भूमिका घेतली असली तरी, खाडी ओलांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

बुधवारी एका बोटीतून ३४ लोकांनी प्रवास केला आणि आतापर्यंत या वर्षात खाडी ओलांडणाऱ्यांची एकूण संख्या १०,७७९ झाली आहे. गेल्या वर्षी या वेळी नोंदवलेल्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ४२ टक्क्यांनी अधिक आहे आणि २०२२ च्या याच टप्प्याच्या तुलनेत ८ टक्क्यांनी जास्त आहे, असे गृह कार्यालयाने सांगितले.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा बोटी थांबवण्याचे वचन दिले होते आणि छोट्या बोटीतून आलेल्या लोकांना रवांडामध्ये पाठवण्याच्या त्यांच्या वादग्रस्त भूमिकेचा ते अजूनही जोरदार प्रचार करत आहेत. स्थलांतरितांना रवांडामध्ये हलवण्याची योजना प्रतिबंधक म्हणून काम करेल आणि ४ जुलै रोजी निवडणुकीनंतर या स्थलांतरितांना हलवणे सुरू होईल, असे सूचित केले आहे.

Israel-Hamas War : गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला, 30 पॅलेस्टिनी ठार…

मात्र, आपण पंतप्रधान झाल्यास ही योजना रद्द केली जाईल, असे मुख्य विरोधी मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी म्हटले आहे. ही योजना म्हणजे एक नौटंकी आहे, असे ते म्हणत आहेत. ओपिनियन पोल या क्षणी मजूर पक्ष हुजूर पक्षाच्यापेक्षा पुढे असल्याचे दर्शविते, मतदानाला अजून चार आठवडे आहेत