मुंबई – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटतील दोघांची कमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात 87 वर्षांच्या धर्मेंद्र आणि 72 वर्षांच्या शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनची चर्चा रंगली आहे.
या सीनबाबत कोणालाही कोणतीही कल्पना नव्हती. मात्र अचानक धर्मेंद्र आणि शबाना यांचा हा सीन पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या सीनची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी एक ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी किसिंग सीनशी संबंधित एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांनी लिहिले की, “मित्रांनो, रॉकी आणि राणीची प्रेमकथा हा चित्रपट जरूर बघा आणि सांगा. या वयात तुमचा धरम त्याची भूमिका साकारण्यात किती यशस्वी झाला आहे.”
Friends, R and R ki prem kahani Film 👍 … please see the film…..and inform .. ..how successful is your Dharam in playing his role …. at this age….🙏 pic.twitter.com/jlZBIHpARm
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 28, 2023
दुसरीकडे, धर्मेंद्र यांच्या या सीनवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “धर्मेंद्र आणि शबाना यांच्या लिपलॉकच्या सीनबाबत कोणालाही अपेक्षा नव्हती आणि मलाही आश्चर्य वाटले,” “हा कसला कौटुंबिक चित्रपट”, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, या चित्रपटात जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नीची भुमिका साकारली आहे.
जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्याच्या अनेक वर्षांनंतरही धर्मेंद्र शबाना यांच्यावर प्रेम करत असतात. दुरावलेल्या धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू करण्यासाठी आलिया आणि रणवीर प्रयत्न करत असतात. अशातच सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना यांचा एक लिपलॉक सीन समोर येतो आणि हे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.