Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. नुकतेच सईने तिचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यापूर्वीही तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सईने या फोटोशूटमध्ये पेस्टल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोत सई फारच ग्लॅमरस दिसत आहे. मात्र तिचे हे बोल्ड फोटोशूट काहींना आवडले नाही. ‘सई मावशी वेस्टर्न संस्कृती पेक्षा भारतीय संस्कृती भारी’, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
View this post on Instagram
तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत, ‘कपडे घाला प्लीझ”, संस्कृती जपा’, असे लिहिले आहे. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सई लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकणार आहे. यात सईसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सईच्या पात्राचे नाव ‘श्रीदेवी’ आणि सिद्धार्थाच्या पात्राचे नाव ‘प्रसन्न’ असणार आहे. सईचा हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.