Dolly Chaiwala Viral Video : चहा बनवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे प्रसिद्ध डॉली चायवालाचे नशीब आता चांगलेच चमकले आहे. डॉली चायवाला नागपुरात चहा विकतो. त्याच्या चहा बनवण्याची पद्धत लोकांना चांगलीच आवडते. दूरदूरवरून फूड व्लॉगर्स डॉली चायवालाचे व्हिडिओ बनवण्यासाठी येतात. आता पुन्हा एकदा डॉलीचा आणखी एक असाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नुकताच डॉली चायवालाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉली चायवाला एका व्यक्तीसोबत लॅम्बोर्गिनी कार चालवताना दिसत आहे. डॉली चायवालाच्या व्हिडीओमध्ये तो एका माणसासोबत लॅम्बोर्गिनी कारमध्ये बसून कार स्वॅगमध्ये रस्त्यावर चालवताना दिसत आहे. डॉली की टपरी नागपूरच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. | Dolly Chaiwala Viral Video
लॅम्बोर्गिनी कार चालवतानाचा हा व्हिडिओ डॉलीच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. यामुळेच लोक हा व्हिडिओ खूप शेअर आणि लाईक करत आहेत. मात्र, ही लॅम्बोर्गिनी कार डॉली चायवालाची आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. | Dolly Chaiwala Viral Video
जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना चहा दिल्याने डॉली चायवाला खूप प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय डॉली त्याच्या हैरस्टाईल आणि कपडे घालण्याच्या पद्धतीमुळेही खूप प्रसिद्ध आहे. चमकदार शर्ट, चष्मा आणि रंगीबेरंगी केस या हटके स्टाइलमुळेही डॉली चायवाला प्रसिद्ध आहे. | Dolly Chaiwala Viral Video
View this post on Instagram
डॉली चायवालाच्या लॅम्बोर्गिनी कारच्या या व्हिडिओवर लोक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, आता माझा शिक्षणावरील विश्वास उडाला आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, डॉली भाईने लॅम्बोर्गिनी घेतली आहे का?