England Sqaud For T20 World Cup 2024 : इंग्लंडने T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंडच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय ख्रिस जॉर्डनने आपली जागा निश्चित केली. जोस बटलरला कर्णधार बनवण्यात आले आहे.
फिल सॉल्ट, विल जॅक आणि जॉनी बेअरस्टो यांसारखे घातक फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये धडाका लावला, ते इंग्लंड संघाचा भाग आहेत. तसेच, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सातत्याने धावा करणारा जोस बटलर टी-20 विश्वचषकात विरोधी संघांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
T20 विश्वचषकात इंग्लंडला रोखणे सोपे नाही!
खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्यामुळे इंग्लंड संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरकडे असेल. इंग्लंड संघावर नजर टाकली तर या धोकादायक फलंदाजांशिवाय मोईन अली, बेन डकेट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंड #EnglandCricket संघात निवडलेले बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या संघाला रोखणे विरोधी संघांना सोपे जाणार नाही.
या गोलंदाजांवर असेल जबाबदारी…
इंग्लंडने 15 जणांच्या विश्वचषक संघात फिरकीपटू म्हणून आदिल रशीद आणि टॉम हार्टली यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय रीस टोपली, मार्क वुड, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन हे वेगवान गोलंदाज म्हणून असतील. सध्या जोस बटलरसह इंग्लंडचे बहुतेक खेळाडू आयपीएल खेळत आहेत.
Our ICC Men’s T20 World Cup squad looking 🔥🔥🔥
Who are you most looking forward to seeing? 👇#EnglandCricket | @T20WorldCup pic.twitter.com/48Q6pO2CzE
— England Cricket (@englandcricket) April 30, 2024
टी-20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ-
जोस बटलर (कर्णधार व यष्टीरक्षक), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.