लग्नी शुक्र, हर्षल, धनस्थानात रवी, बुध, तृतियेत राहू, मंगळ अष्टमात गुरू वक्री, भाग्यात शनी वक्री, केतू व प्लुटो वक्री लाभात नेप्चून आहे. ग्रहमान संभ्रमात टाकणारे आहे. तरी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. नवीन कामे मिळतील. योग्य व्यक्तींची साथ मिळाल्याने कामे मार्गी लावणे सुकर होईल. अनावश्यक खर्चाला चाप लावावा लागेल.
कामात गुप्तता राखा
द्विधा मनःस्थिती होईल तेव्हा निर्णय घेताना सबुरी ठेवा. भविष्याची तरतूद करून ठेवण्याचा तुमचा मानस असेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन करार करताना त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करा. निष्णात व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. नोकरीत सतर्क राहून कामात गुप्तता राखा. अनावश्यक खर्चास फाटा द्या. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा नको. शुभ दिनांक : 13, 14, 17, 18
पैशांची चिंता मिटेल
कामाची आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. अनपेक्षित चांगली घटना जीवनाची दिशा बदलेल. व्यवसायात कामाचा उत्साह राहील. स्पष्ट बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत आपले काम बरे की आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन अनुभव येतील. घरात काही कारणाने ठरवलेले बेत पुढे ढकलावे लागतील. शुभ दिनांक : 13, 14, 15, 16, 19
वादाचे प्रश्न टाळा
डोळ्यासमोर खूप कामे असतील त्यामुळे कुठल्याही कामाला प्राधान्य द्यावे हा संभ्रम राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. कामात विलंब झालेला सहन होणार नाही. नोकरीत लवचिक धोरण ठेवलेत तर त्रास कमी होईल. स्वतःची मते मांडताना थोडे तारतम्य ठेवावे. घरात कुटुंबाच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. शुभ दिनांक: 13, 14, 15, 16, 17, 18
कामाचा कंटाळा येईल
तुमच्या खर्चिक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. पैशाची ऊबही हाती असल्याने सढळ हाताने पैसे खर्च कराल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे प्रगती कराल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती मिळकतील. नवीन कामेही हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलावीशी वाटतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. शुभ दिनांक : 13,14,15,16,17,18,19
प्रवासयोग संभवतो
सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनभव येतील. तेव्हा चार हात लांबच राहा. व्यवसायात पैशाचे सोंग घेता येत नाही हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे पावले टाका, उधार ऊसनवार शक्यतो टाळा खेळत्या भांडवलाची गरज हितचिंतकांच्या मदतीने पूर्ण होईल. नोकरीत नियोजनबद्ध काम केलेत तर वरिष्ठांची तक्रार नसेल. प्रवासयोग संभवतो. घरात पेल्यातील वादले उठतील तरी डोके शांत ठेवा मनःस्वास्थ्य सांभाळा.
शुभ दिनांक : 15, 16, 17, 18, 19
विचित्र अनुभव येईल
घर व व्यवसाय या दोन्ही गोष्टींकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे हा क्रम ठरवून त्याप्रमाणे कृती करा. समतोलता ठेवून कामे वेळेत पूर्ण कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत अंधविश्वासाने कुठलीही कृती करू नका. कामाची सत्यता पडताळून बघा. गोड बोलून तुम्हाला कुणी फसवत नाही ना? याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 13, 14, 17, 18, 19
मौनव्रत पाळा
कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तांत्रिक अडचणींवर मात करून कामांना गती द्याल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन राहील. स्वतःचे असे स्थान निर्माण करण्याचा मानस पूर्ण होईल. आव्हानात्मक कामात रस वाटेल. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात वादाचे प्रसंग येतील तरी मौन व्रत पाळा. स्वतःचाच हेकेखोरपणा चालू ठेवू नका. शुभ दिनांक: 13,14,15,16,17,18
कामाचा ताण वाढेल
स्वभाव खूपच हळवा होईल त्यामुळे भावनेला महत्त्व द्याल. व्यवसायात कामामुळे त्रास सहन करावा लागेल. अपेक्षा बऱ्याच असतील. पण वेळ कमी पडेल. पैशाचीही चणचण भासेल. स्पर्धक हातातोंडाशी आलेली कामे काढून घेतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मानसिक अशांतता राहील तेव्हा थोडी सबुरी ठेवा. कामात बदल संभवतो. घरात तुम्हाला एकटेपणा जाणवेल. त्यामुळे तुम्ही स्वतःचा वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल.
शुभ दिनांक : 15, 16, 19