Pune Gramin : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

लोणी काळभोर (प्रतिनिधी) – कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

या संदर्भात सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, या प्रकरणी प्रेम राजु लोंढे ( वय. १९, रा. रेल्वे गेट जवळ आळंदी रस्ता, ता. हवेली मुळ रा. जामखेड, गोरोबा थिएटर जवळ, अहमदनगर ), ऋषिकेश उत्तम लोंढे ( वय. २६, रा. पानमळा रस्ता, ता. हवेली, जि पुणे मुळ रा. बावळगाव, जि. बीड ), गणेश भगवान खलसे ( वय. २२ ) व तानाजी भाऊसाहेब गावडे ( वय. २३, दोघेही रा. माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे ) या चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी हॉटेल व लॉज चेक करणे, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रगस्त घालत होते. यावेळी पहाटे सव्वा दोन वाजता रात्रपाळी बीट मार्शल जी के आडके व ईश्वर भगत यांना माहिती मिळाली कि ७ ते ८ इसम हे म्हातोबाची आळंदी रेल्वे पूलाजवळ हत्यारासह थांबले असुन ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे, हवालदार आनंद पाटोळे, श्रीनाथ जाधव, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, नितेश पुंडे, जी के आडके, ईश्वर भगत घटनास्थळी गेले. पोलीसांची चाहूल लागताच ते त्या ठिकाणाहून पळुन जाऊ लागले. मात्र पोलीसांनी चौघांना जेरबंद केले. उर्वरीत दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळुन गेले. चौघे जण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या जवळ २ लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु सापडल्या. ते कुंजीरवाडी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी जाणार असल्याची त्यांनी कबूली दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.

Pune Gramin : धक्कादायक! 500 रु.कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रंजन शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे, हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, बाजीराव वीर, महिला पोलीस विश्रांती फणसे, ईश्वर भगत व जी के आडके यांच्या पथकाने केली आहे.