विवाहासाठी धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा लागू होणार

बंगळूर – केवळ विवाहाच्या उद्देशातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा कर्नाटकात लागू केला जाईल, असे सूतोवाच त्या राज्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी केले.

धर्मांतराच्या कृत्यात सामील असणाऱ्यांना कठोर आणि तातडीने शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण आदेश दिला.

केवळ विवाहासाठी होणारे धर्मांतर अवैध असल्याचे न्यायालयाने त्या आदेशाद्वारे स्पष्ट केले. त्यापार्श्‍वभूमीवर, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असणाऱ्या रवी यांनी एक ट्विट केले.

अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर कर्नाटकात कायदा आणला जाईल. जिहादींकडून होणारा आमच्या भगिनींचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले.

काही दिवसांपासून लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. त्यातून लव्ह जिहादशी संबंधित घटनांना आळा घालण्यासाठी कायदेशीर पाऊले उचलण्याचा मानस उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेश या भाजपशासित राज्यांच्या सरकारांकडून बोलून दाखवण्यात आला. आता त्या राज्यांमध्ये कर्नाटकची भर पडली आहे.

Leave a Comment