केंद्र सरकारची मोठी कारवाई; तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी

OTT Platform Ban|  केंद्र सरकारने तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोर्नोग्राफी आणि अश्लील कंटेट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते.

सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र तरीही अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवण्यात न आल्याने अखेर केंद्र सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आयटी कायदा, भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्यासह अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 18 ओटीटी प्लॅटफॉर्मसह 19 वेबसाइट्स, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आली आहे.  OTT Platform Ban|

तसेच फेसबुकवरील 12, इन्स्टाग्रामवरील 17, X वरील 16 अकाऊंट आणि युट्यूब वरील 12 चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर एका कंटेटचा मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 आणि 67ए, आयपीसीचे कलम 292 चे उल्लंघन असल्याचे दिसून आले. बंदी घालण्यात आलेल्या एका OTT अॅप्सला एक कोटींहून अधिक डाउनलोड करण्यात आले आहे.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे? OTT Platform Ban| 

Dreams Films
Voovi
Yessma
Uncut Adda
Tri Flicks X Prime
Neon X VIP
Besharams
Hunters
Rabbit
Xtramood
Nuefliks
MoodX
Mojflix
Hot Shots VIP
Fugi
Chikooflix Prime Play.

हेही वाचा: 

पंतप्रधानांच्या समितीने केली निवड,’ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त’