शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर आदळले, अनेक वर्षातली अशा प्रकारची पहिली घटना

केप कार्निव्हल – एक असामान्यपणे शक्तिशाली सौर वादळ काल रात्री पृथ्वीवर आदळले, त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंतच्या आकाशात आकाशीय प्रकाश दिसू लागला. असे सौर वादळ वीस वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठे सौर वादळ होते, असे मानले जाते आहे. तथापि हे सौर वादळ पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेमध्ये आठवड्याच्या अखेरपर्यंत चालू राहिल्याने पृथ्वीच्या वातावरणातील कम्युनिकेशन नेटवर्क, उपग्रह आणि पॉवर ग्रीडमध्ये संभाव्य व्यत्यय येण्याचा धोका देखील आहे. (solar storm has hit Earth)

सूर्यापासून अनेक प्लाझ्मा आणि चुंबकीय लहरी तीव्रतेने बाहेर फेकल्या जाण्याच्या या प्रक्रीयेला कोरोनल मास इजेक्शन्स म्हणतात. अनेक वर्षातली अशा प्रकारची पहिली घटना काल रात्री झाली, असे यूएस नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या स्पेस वेदर प्रिडिक्शन सेंटरने म्हटले आहे.

नंतर ते अत्यंत तीव्र भूचुंबकीय वादळात रुपांतरित झाले. यापूर्वी ऑक्टोबर २००३ मध्ये हॅलोवीन स्टॉर्म्स नावाचे असेच सौर वादळ पृथ्वीवर थडकले होते. या वादळामुळे स्वीडनमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. आणि दक्षिण आफ्रिकेतील वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधांचे नुकसान झाले होते.

आगामी काही दिवसांमध्ये अधिक कोरोनल मास इजेक्शन्सचा पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सौर वादळामुळे उत्तर युरोपपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटांपर्यंत आकाशात दिसणाऱ्या प्रकाशाच्या प्रतिमा सोशल मीडियावर शेअर केल्या जात होत्या.

या सौर लहरींमध्ये पाण्याचे प्रमाण पृथ्वीपेक्षा १७ पट अधिक असते. आपल्या ११ वर्षांच्या भ्रमणकक्षेत सूर्य पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आलेला असतो. सूर्याच्या वातावरणातील घटनांमध्येही वाढ झालेली असते.

सौर लहरी चुंबकीय क्षेत्राने आकर्षित होऊन त्यातून सौर वादळ उत्पन्न होते. या वादळातून उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सर्जनाचा अवकाश यानांवरही परिणाम होणे शक्य असते. परंतु हे वादळ पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून पृथ्वीचे वातावरण रोखते. कबूतर आणि शरीरात जैविक दिशादर्शक यंत्रणा असलेल्या काही इतर प्रजातींवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

यापूर्वी नोंद झालेले इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूचुंबकीय वादळ कॅरिंग्टन इव्हेंट म्हणून ओळखले जाते. सप्टेंबर १८५९ मध्ये झालेल्या या वादळाचे नाव ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड कॅरिंग्टन यांच्या नावावर निश्‍चित करण्यात आले.