तिकीट बारीवर ‘Fighter’ची यशस्वी घौडदौड ! तीन दिवसात केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Fighter Collection : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने ‘फायटर’ या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन केले आहे. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगलीच ठरत आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. स्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत या चित्रपटाची कथा खूप पसंत केली जात आहे. फायटरमधील हवाई ॲक्शनही लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

त्याचबरोबर फायटरला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हृतिक आणि दीपिकाचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सातत्याने चित्रपटगृहांकडे वळत आहेत. चित्रपटात देशभक्तीचा रंग समाविष्ट करण्यात आला आहे, त्यामुळे या चित्रपटाला अधिक पसंती दिली जात आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्कृष्ट व्यवसाय करून लोकांना खूश केले. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दरम्यान, चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. ‘फायटर’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला 28 कोटी रुपये कमावले आहेत.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 22.5 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 39 कोटी. तीन दिवसांत दीपिका आणि हृतिकच्या चित्रपटाने एकूण 900 कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, रविवारी हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा सहज पार करेल असे सांगण्यात येत आहे.

तिसऱ्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत फायटरने अभिनेत्याच्या ‘बँग बँग’ चित्रपटाला देखील मागे टाकला आहे. बँग बँगने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 20.10 कोटींचा व्यवसाय होता. हृतिक आणि दीपिकाच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.