द्राक्ष बागायतदारांना निर्यातक्षम आणि भरघोस उत्पादन मिळवून देण्यासाठी ‘कॅन बायोसिस’चे यशस्वी पाऊल !

नाशिक – येथील हॉटेल SSK Solitaire येथे कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीच्या ब्रीग बॉस या CIB प्रमाणित उत्पादनाचा अनावरण सोहळा आणि प्रगतशील शेतकरी (Farmer) वितरक यांच्यासाठी परिसंवाद १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रगतशील शेतकरी आणि अधिकृत विक्रेत्यांनी उपस्थिती नोंदवली.

द्राक्ष बागेत (grape farmer) भेडसावणाऱ्या समस्या, घ्यावयाची काळजी आणि कॅन बायोसीस कंपनीची वाटचाल आणि योगदान या संदर्भात चर्चासत्र करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी कंपनीची सद्यपरिस्थती आणि भविष्यातील भारतीय बाजारपेठेची स्थिती यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संदीपा कानिटकर यावेळी म्हणाल्या,”व्हायटरमोन हे एक पेटंटेड जैविक स्वरूपातील फवारणी योग्य बायो फर्टिलायझर असून हे भारतीय शेतकऱ्यासोबतच, परदेशी शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेले उत्पादन आहे. कार्यक्रमात अनावरण झालेल्या ब्रीग बॉस विषयी मार्गदर्शन करते वेळी त्यांनी सांगितले की ब्रीग बॉस हे उत्पादन संपूर्णपणे स्वदेशी, रसायनमुक्त आणि CIB प्रमाणित उत्पादन आहे. हे द्राक्ष पिकातील मिलिबग, उडद्या आणि इतर किडींचे उत्तम प्रतिबंध करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या आधुनिक जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग मिलीबग, थ्रिप्स आणि अळी नियंत्रणासाठी प्रभावी ठरेल.तसेच त्यांनी सुडो आणि मिलॅस्टीन-के चा वापर डाऊनी करपा आणि भुरी नियंत्रणासाठी नाशिक द्राक्ष विभागात उत्कृष्ट पद्धतीने केला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मातीचे आरोग्याबाबत, कॅन बायोसिसच्या स्पीड कंपोस्ट या उत्पादनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या स्पीड कंपोस्ट हे उत्पादन पंजाब, हरियाणा राज्यात हवा प्रदूषण कमी करण्यात मदत करत असल्याचे नोंद घेत या उत्पादनासाठी कंपनीला जागतिक दर्जाचे WIPO Gold वायपो गोल्ड मेडल मिळाले आहे. 2020 National MSME award तसेच डी सॅन्गोज या युरोपिअन बहुराष्ट्रीय कंपनी सोबत झालेल्या धोरणात्मक कराराची माहिती उपस्थितांना दिली. या करारामुळे शेतकऱ्यांसाठी भविष्यात उपुयक्त आणि आश्वासक स्वरूपात पीक पोषण आणि संरक्षण उत्पादने बाजारात आणण्यासाठी मदत होईल असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना कानिटकर यांनी असे आवाहन केले की आगामी काळात शेतकऱ्यांनी फक्त पीक पोषण याबद्दल विचार न करता पीक संरक्षण आणि संवर्धन या बाबीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी ३० टक्के खर्च हा जैविक निविष्ठांवर होणे गरजेचे आहे. यावेळी कंपनीचे सेल्स ऑपरेशन – उपाध्यक्ष राहुल पारखी यांनी कंपनीच्या भारतीय बाजारपेठेतील योजना विषयी सखोल मार्गदर्शन केले.

कंपनीचे बिझनेस डेवलपमेंट – उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार यांनी जागतिक बाजारपेठेमध्ये रेसिड्यू फ्री भारतीय द्राक्षाची वाढती मागणी आणि जैविक उत्पादनांना असणारी संधी यावर मार्गदर्शन केले. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानासोबत जैविक निविष्ठांची निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात महत्वाची भूमिका असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या समारोपात काही नामवंत वितरकांनी कॅन बायोसिस कंपनीच्या ताबा, व्हायटरमोन आणि ब्रिगेड बी या उत्पादांची गुणवत्ता आणि परिणामकारकता गेल्या २ दशकांपासून अबाधित आहे याबद्दल आभार मानले आणि कॅन बायोसिस प्रति विश्वास नोंदवला.कॅन बायोसिसचे अग्रोनॉमिस्ट अमाप पाटील यांनी द्राक्ष बागेचे पोषण आणि संरक्षण जैविक पद्धतीने कसे करावे यावर सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये त्यांनी झॅग्नो या उत्पादनाचे वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या प्रात्यक्षिकांचे रिझल्ट आणि याचा झिंक उप्लब्धतेमध्ये असणारा वाटा हे विस्तृतपणे सांगितले.

कार्यक्रमाचा समारोप कॅन बायोसिसच्या नाशिक आणि जळगाव विभाग प्रमुख प्रदीप पानसरे यांनी कंपनीच्या कामकाज याविषयी विवेचन केले. तसेच नाशिक विभागप्रमुख संतोष धोंगडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विशाल गोसावी (Agronomist) आणि संपूर्ण नाशिक सेल्स अँड मार्केटिंग टीम यांनी परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या कार्यक्रम पार पाडला.