अनोखा विक्रम ! ‘या’ भारतीय व्यक्तीने नाकाने टायपिंग करत मोडला स्वतःचाच विक्रम

“टायपिंग मॅन ऑफ इंडिया”चा आणखी एक पराक्रम
हैदराबाद : एका भारतीय व्यक्तीने नाकाने इंग्रजी वर्णमाला सर्वात जलद टाइप करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे विनोद कुमार चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून या प्रकारात त्याने तीन विक्रम केले असून प्रत्येक वेळी तो स्वतःचा विक्रम मोडण्यात यशस्वी झाला.

44 वर्षीय विनोद कुमार चौधरी ने 2023 मध्ये 27.80 सेकंदात नाकाने टाइप करून पहिल्यांदा विजेतेपदावर दावा केला होता. दुसऱ्या प्रयत्नात तो २६.७३ सेकंदापर्यंत खाली आला. आपल्या ताज्या प्रयत्नात त्याने अवघ्या 25.66 सेकंदात हा पराक्रम पूर्ण केला.

गिनीज बुकनुसार, रेकॉर्ड करण्यासाठी, चौधरीला QWERTY कीबोर्डवर रोमन वर्णमाला टाइप करावी लागणार होती आणि प्रत्येक अक्षरादरम्यान एक जागा म्हणजे स्पेस सोडावी लागणार होती जे काम त्याने उत्तम प्रकारे पूर्ण केले.

त्याच्या टायपिंग रेकॉर्डबद्दल बोलत असताना, चौधरी यांनी गिनीज बुकला सांगितले की तो आता “टायपिंग मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखला जातो. नाकाने टायपिंग करण्यासोबतच, त्याच्याकडे “5.36 सेकंदात पाठीमागे वर्णमाला टाइप करण्याची सर्वात जलद वेळ (एक हाताने) आणि पाठीमागे हाताने अक्षरे टाइप करण्याची सर्वात जलद वेळ 6.78 सेकंद” असा रेकॉर्ड आहे.

“माझा व्यवसाय टायपिंग आहे, म्हणूनच मी त्यात एक रेकॉर्ड करण्याचा विचार केला, ज्यामध्ये माझी आवड आणि माझी उपजीविका दोन्ही टिकून आहे माझा विश्वास आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही समस्यांचा सामना करावा लागला तरी, तुम्हाला तुमची आवड अनंतकाळपर्यंत टिकवून ठेवावी लागेल,” असे तो पुढे म्हणाला.