मादाम तुसॉं संग्रहालयात दिसणार श्रीदेवीचाही मेणाचा पुतळा

सिंगापूर – येथील मादाम तुसॉं संग्रहालयात आता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचाही मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये या पुतळ्याचे बोनी कपूर व जान्हवी आणि खुशी या श्रीदेवीच्या दोन्ही लेकींच्या उपस्थितीत अनावरण होईल. “मि. इंडिया’ मधील “हवाहवाई’ गाण्यातील श्रीदेवीने साकारलेल्या व्यक्‍तिरेखेवर आधारित हा मेणाचा पुतळा आहे.

श्रीदेवीच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तिची पोज, चेहर्यावरील हावभाव, मेकअप, पोषाख आदींचा विचार करून 20 तज्ज्ञांच्या पथकाने पाच महिने परिश्रम घेऊन हा पुतळा साकारला. श्रीदेवीचा मुकुट, पोषाख व दागिन्यांच्या थीडी प्रिंटचा अभ्यास करून हा पुतळा बनवण्यात आला.

श्रीदेवीच्या पुतळ्याच्या काही भागांची झलक तिच्या जन्मदिनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आली. तिचा पुतळा तयार करून मादाम तुसॉं संग्रहालयाने तिला दिलेल्या सन्मानाबाबत बोनी कपूर यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. पुढील महिन्यात या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, असे संग्रहालयाचे व्यवस्थापक ऍलेक्‍स वॉर्डन यांनी

Leave a Comment