समुद्रातील बोटीवर काम करणाऱ्या महिलेने उघडले अब्जाधीशांचे रहस्य; त्यांचे विचित्र छंद जाणून तुम्हाला धक्का बसेल !

मुंबई – जगातील श्रीमंत लोकांच्या विचित्र छंदांबद्दल अनेक वेळा ऐकायला आणि वाचायला मिळते. त्याचे छंदही अनेक प्रकारचे आहेत. एका अहवालानुसार, जो जितका श्रीमंत आहे तितकेच त्याचे छंद मोठे आणि महाग आहेत. बहुतेक श्रीमंत लोक प्रवास, कपडे आणि सामानावर पैसे खर्च करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला काही श्रीमंत लोकांच्या विचित्र छंदांबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

हे जाणून घेतल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की या श्रीमंतांच्या मागण्या तरी काय आहेत? जगातील अव्वल अब्जाधीश जहाजांवर प्रवास करतात आणि सुट्टी घालवतात. ते जगातील विविध देशांमध्ये सुट्टीसाठी जातात. एका मीडिया रिपोर्टनुसार, समुद्रातील बोटीवर (सुपर याट) काम करणाऱ्या मेक्सिकोच्या गिझेल अगुएटाने श्रीमंतांच्या विचित्र छंद आणि कृत्ये याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. चला जाणून घेऊया.

39 वर्षीय गिझेल सध्या सुपरयाटवर इंटीरियरची जबाबदारी सांभाळत आहे, जी जगातील श्रीमंतांची सफर करते. मला माझं काम आवडतं, पण काही उद्योगपती अशा मागण्या करतात की मन बिघडतं, असं ती म्हणते.

गिझेलने एक घटना सांगितली जेव्हा एका लक्षाधीशाने क्रू मेंबरला विचारले की तो काचेच्या टेबलावर झोपून शौच करू शकतो का? त्या बदल्यात तो 10000 डॉलर्स म्हणजेच सुमारे आठ लाख रुपये देईल. हे ऐकून क्रू मेंबर आश्चर्यचकित झाला, परंतु त्याला यासाठी परवानगी दिली गेली की नाही हे त्यांनी सांगितले नाही.

एका अब्जाधीशाने अशीच एक धक्कादायक मागणी केल्याचं सांगत गिझेल म्हणाली की रात्रीचे जेवण करताना क्रू मेंबर्सपैकी एक महिला कर्मचाऱ्याने फक्त त्याच्याकडे बघत राहायला हवे. त्यानुसार रात्री जेवण संपेपर्यंत एक महिला क्रू मेंबर उभी राहून त्याला पाहत उभी राहिली.

गिझेल म्हणते की आमच्या इंडस्ट्रीत नाही म्हणायला पर्याय नाही. प्रवाशाने कितीही विचित्र मागणी केली तरी चालेल. जिझेलने सांगितले की, जेव्हा शारीरिक संबंधांची मागणी होते किंवा क्रू मेंबरच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, तेव्हा आम्ही कठोरपणा दाखवतो.

या उद्योगात नोकरी मिळवण्यासाठी आकर्षक असणं खूप महत्त्वाचं असल्याचं गिझेल सांगते. सुपरयाटच्या मालकाचे म्हणणे आहे की क्रू मेंबर सुंदर दिसले पाहिजे. जर तुम्ही गोंडस आणि सुंदर असाल तर तुम्ही नोकरीसाठी योग्य आहात.