nagar | संगमनेरातून गांजा, हेराॅइनसह आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथून अवैध गांजा, व हेराॅइनची विक्रीकरा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबादास शांताराम शिंदे (वय ४३, रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचा सपाटा लावला आहे. काल कोपरगाव तालुक्यात अवैध गांजा पकडण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरात अवैध गांजा, व हेराॅइन विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पथकाने घराची पंचा समक्ष झडती घेत असता पलंगाचे खाली पांढरे रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला.

तसेच त्याचे पॅन्टचे खिशात प्लॅस्टीकचे पारदर्शक पिशवीत विटकरी रंगाची पावडर मिळुन आली. गर्द/हेरॉईन ताब्यात घेतले. ४५ हजार ३० रुपये किंमतीचा ४ किलो ४९८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, ७२ हजार रुपये किंमतीचा गर्द/हेरॉईन व ४ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याबाबत संगमनेर शहर् पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, अंमलदार सचिन अडबल, संतोष खैरे, अमृत आढाव, प्रमोद जाधव, व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.