बारामती: विनयभंगप्रकरणी आरोपीला 1 वर्षाची शिक्षा

बारामती – विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वागडोळे यांनी सुनावली. प्रशांत मोजर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

बारामती शहरातील तांदुळवाडी कल्याणीनगर येथे १५ जून २०१८ रोजी हा प्रकार घडला. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी याने घरात घुसून पीडित महिलेचा हात धरला. तु मला आवडतेस पण मला रिस्पॉन्स देत नाही असे म्हणत महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुला तसेच तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने बारामती तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

बारामती न्यायालयात साक्ष पुरावे तसेच सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत येथील प्रथम वर्ग नाही दंडाधिकारी वागडोळे यांनी आरोपी यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील राहुल सोनवणे यांना पोलीस नाईक पोपट कवितके यांनी सहकार्य केले. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार बंडगर यांनी केला.