प्लॅस्टिक विरोधात कारवाई; 25 हजारांचा दंड वसूल

पिंपरी – प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने सध्या शहरातील विविध दुकानांची तपासणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांमध्ये विविध भागांमध्ये याबाबत कारवाई करून 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर-थरमॅक्‍स चौकातील 10 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील तीन व्यावसायिकांकडे कॅरीबॅग आणि प्लॅस्टिक चमचे असा 4 किलोचा माल सापडला. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 15 हजार इतका दंड वसूल करण्यात आला.

पिंपळे सौदागर, चॅलेंजर शाळा येथील आठवडा बाजारात प्लॅस्टिक विकणाऱ्यांकडून 22 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. रविवारी (दि. 13) ही कारवाई करण्यात आली. तर, शुक्रवारी 32 दुकानांची तपासणी करण्यात आली.

Leave a Comment