अभिनेता ऋषी सक्सेनाचे 6 वर्षानंतर मालिकाविश्वात कमबॅक

Entertainment News|  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री करणार आहे.

अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मिहीर शर्मा हा उत्तम शेफ असल्याचे दाखवले आहे.परंतु आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

ऋषी सक्सेना याने आवडीच्या मालिकेत काम  करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने या नव्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, अभिनेत्री ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाचे फोटो सोशल मीडियावर ननेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची देखील पसंती मिळते. सध्या ईशा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत मुख्यभूमिकेत दिसत आहे.

हेही वाचा: 

NDA बैठकीत नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींना दिला मोठा संदेश, जाणून घ्या काय म्हणाले बिहारचे मुख्यमंत्री