अभिनेता थलपति विजयने CAAला विरोध; तमिळनाडू सरकारला केली ‘ही’ विनंती

Vijay on CAA| rकेंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा अनेकांकडून विरोध करण्यात आला. CAA लागू झाल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. केवळ हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन निर्वासितांनाच भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. यातच आता दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजयने नाराजी व्यक्त करत हा कायदा अमान्य केला आहे.

तामिळ अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे नेते थलपथी विजय यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), 2019 लागू केल्यानंतर त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांसाठी कायदा मंजूर झाल्यानंतर चार वर्षांनी, केंद्राने नियम घालून CAA लागू केला. तेव्हापासून अनेकजण या संदर्भात आपली मते मांडत आहेत. त्याचवेळी दक्षिणेतील अभिनेता थलपथी विजयनेही यावर भाष्य केले.

त्याने पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लिहिले, ‘ जिथे देशात सर्व नागरिक सामाजिक सद्भावनेने राहतात तिथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा सारख्या कोणत्याही कायद्याचा स्वीकार होऊ शकत नाही. सर्व नेत्यांनी देशात कायदा लागू होऊ नये हे सुनिश्चित केलं पाहिजे. तमिळनाडूतही कायदा लागू करु नका.’ अशी विनंती देखील त्याने केली.

विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्रावर टीका केली आहे आणि भाजप सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हा भाजपचा ‘विभाजनाचा अजेंडा’ असल्याचे म्हटले आणि लोक त्यांना (भाजपला) योग्य धडा शिकवतील असे म्हटले आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी थलपति विजयने अधिकृतरित्या राजकीय पक्ष तमिळनाडू वेट्री कडगमची घोषणा केली. तसंच 2024 ची निवडणूक लढवणार नाही असंही जाहीर केले होते.

हेही वाचा: 

तुम्हाला माहिती आहे का पीडीएफचा शोधकर्ता कोण आहे ? जाणून घ्या संपूर्ण इतिहास