अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने केले पुण्यातील ‘या’ खास ठिकाणी फोटोशूट

Madhurani Prabhulkar Photoshoot|  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहचली. यात ती अरुंधतीची भूमिका साकारत आहे.परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच मधूराणीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

मधुराणीने शेअर केलेल्या या फोटो तिने लाल रंगाचं कलमकारी डिझाइन असलेलं ब्लाऊज, त्यावर लेव्हंडर रंगाची साडी आणि केसात गुलाब असा सुंदर लूक केला आहे. तिचे तिने यात एकापेक्षा एक पोज देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मधुराणीने हे फोटो शेअर करत लिहिले की, “एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली.”

“या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे. पुण्यातील भाजी मंडई…माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण… तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग…सकाळसकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील,” असे म्हणत मधुराणीने  आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  Madhurani Prabhulkar Photoshoot|

मधुराणीचे हे फोटो चाहत्यांसह कलाकार मंडळींच्या देखील पसंतीस पडले आहे. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.  Madhurani Prabhulkar Photoshoot|

हेही वाचा: 

गोविंदाने लॉन्च केला स्वत:चा ओटीटी अॅप; सबस्क्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये