Adar Poonawalla यांची पत्नी नताशाचा स्टनिंग लूक, फोटोपाहून सगळेच थक्क

मुंबई – नताशा पूनावालाला फॅशन जगतात कोणत्याही ओळखीची गरज नाही. कोणत्याही पोशाखात ग्लॅमरस कसे दिसावे हे नताशा पूनावाला जाणते. नताशा पूनावाला कोणत्याही फॅशन ट्रेंडचे अनुसरण करत नाही, त्याऐवजी ती स्वतःचे वेगळे फॅशन ट्रेंड आणते, जे इतर फॉलो करतात.

नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या स्टाईलने लोकांना ती प्रभावित करते. अशातच नताशाचे काही लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा स्टायलिश अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

नताशा पूनावालाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ताज्या फोटोंमध्ये ती मेटॅलिक पिंक मिनी ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. तिचा आउटफिट वीकेंड पार्टीसाठी परफेक्ट दिसतो. या फोटोत चमकदार सोनेरी गोल्डन हील्समध्ये नताशा स्टनिंग दिसत होती. अॅक्सेसरीजसाठी नताशाने स्टेटमेंट नेकपीस, कानातले आणि अंगठ्या या ड्रेस सोबत कॅरी केल्या होत्या.


तिने तिच्या केसांची उंच पोनीटेल बनवली होती, ज्यामुळे ती आणखीनच ग्लॅमरस दिसत होती. मेकअपबद्दल सांगायचे तर तिने विंग्ड आयलायनरसह गुलाबी लिपस्टिक लावली आहे.

याआधी नताशा पूनावालाचे ब्लू प्रिंटेड पँटसूट सेटमधील काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोतही तिचा एकंदर लूक सर्वांनाच आवडला होता. मेट गाला 2022 मध्येही तिच्या लूकची चर्चा सर्वत्र होती.