चौथ्या लाटेबाबत अदर पुनावाला यांचं महत्त्वाचं वक्तव्य म्हणाले,’भारतातही करोनाची चौथी लाट…’

वुहान :  मागील दोन वर्षापासुन जगाला पूर्णपणे बंदिस्त करणाऱ्या करोनाचा सध्या भारतात प्रसाराचा वेग कमी झाला आहे. मात्र ज्या देशातून या विषाणूची उत्पत्ती झाली त्या चीनने आता पुन्हा एकदा जगाला टेन्शन दिले आहे. कारण चीनमध्ये करोनामुळे पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे.

जगात अनेक देशात लसीकरणामुळे करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत  आहेत तर दुसरीकडे चीनने  जगाला पुन्हा धडकी भरली आहे. चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला असून हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हेरियंटमुळे चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चीनसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच भारतातही करोनाची चौथी लाट येण्याची वर्तविण्यात येत असतांना  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

अदर पूनावाला भारतातील  करोनाच्या चौथ्या लाटीबाबत म्हणाले,’जर कधी करोनाची चौथी लाट भारतात आली तर ती सौम्य असणार असा विश्वास व्यक्त केला.  भारताने योग्य लस निवडल्यामुळेच आज भारतात करोना रुग्णसंख्या इतकी कमी आहे. असे ही अदर पूनावाला  यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,’ अमेरिका. युरोपमध्ये आज करून रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आहे. मात्र तुलने आपल्याकडे कमी रुग्ण आहेत कारण आपण योग्य लस निवडली,” असंपूनावाला म्हणाले.

दरम्यान,  चीनमधील शांघाईपासून ७० किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका करोना रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिक्वेंसिंग डेटा आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सांगण्यात आले आहे.