आदर्श सरपंच : कुळे गावात वाहू लागली विकासाची गंगा सरपंच मंदाताई बबन मराठे यांची दमदार कामगिरी

कुळे गावच्या विकासात हातभार लावणारे माजी सरपंच कै. बबन लक्ष्मण मराठे यांचं दुर्दैवाने करोना काळात निधन झालं. निधन झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंचपद रिक्‍त होते. लोकांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची धुरा त्यांच्या पत्नी मंदाताई बबन मराठे यांच्याकडे आली. सरपंचपद मिळाले खरे; पण त्याच्या कसोटीला उतरण्यात मंदाताई कुठेच कमी पडल्या नाहीत. हे गेल्या अडीच वर्षांतील कामगिरीवर ठळकपणे दिसून येते. गावातील विविध सामाजिक प्रश्‍न, समस्या सोडवण्यासाठी कठीणसमयी मुलं अरुण बबन मराठे व अमोल बबन मराठे तसेच मित्रपरिवार यांच्या मदतीने त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. मुळशीतल्या अशा कोळवण खोऱ्यात एक आदर्श असे गाव निर्माण करण्याचे व प्रयत्नशील राहण्याचे धोरण मंदाताई मराठे यांनी स्वीकारले आहे.

मुळशी तालुक्‍यातले कोंढावळे हे गाव. त्यांनी त्या काळी 7 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच बालवाडी शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर आलेली सरपंच पदाची धुरा त्यांनी उत्तमपणे सांभाळत आहे. सामाजिक उपक्रम राबवत गावगाड्याच्या विकासाचा रथही ओढत आहे. त्यांना सामाजिक उपक्रमांची विशेष आवड आहे. ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, शिवजयंती, हरिनाम सप्ताह यामध्ये विशेष सहकार्य करत त्यांनी एक आदर्शमाता मंदाताई यांचे माहेर म्हणजे सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.

तर कुळे गावच्या विकासात भर घालण्यासाठी विविध रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन काम, सभामंडप ही काम शासकीय फडातून पाठपुराव्यासह करण्याबरोबरच स्वखर्चातूनही निढळ हाताने केली आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने कुळे गावातही विकासाची गंगा वाहिली आहे. सरपंच म्हणून जे गावचं देणं लागतो ते फेडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने काम करणे शक्‍य झाले असल्याचे मंदा बबन मराठे यांनी सांगितले.
एक महिला असून आदर्श असे काम आपल्या कृतीतून करून कुळे गावाला उज्ज्वल करण्याचे ध्येय अंगी बाळगून काम करत आहे. समाजात अशा व्यक्‍तींची अतिशय आवश्‍यकता असून कुळे गावच्या सरपंच मंदाताई बबन मराठे यांचा आदर्श इतर सरपंचांनीही घ्यावा, असा नक्‍कीच आहे.

कै. बबन मराठे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून केलेली कामे

  • कुळे गावातील भैरवनाथ मंदिर सभामंडप -8,00,000 (आठ लाख रुपये)
  • मेडजाई मंदिराकडे जाणारी पायवाटसाठी – 3,00,000 (तीन लाख रुपये)
  • साठेवाडी दत्त मंदिरकरिता – 2,50,000 (अडीच लाख रुपये) यात मार्बल डेकोरेशन केले आहे.
  • मराठेवाडी ड्रेनेज लाइन – 1,00,000 (एक लाख रुपये)
  • माध्यमिक विद्यालय बांधकामाकरिता शौचालयाच्या वीट बांधकासाठी 1 लाख 40 हजार.
  • कुळेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आरोग्य शिविर घेण्यात आले. यात चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयविकार उपचार व इतर आरोग्यसेवा देण्यात आली – 3,00,000 (तीन लाख रुपये).
  • वैयक्‍तिक खर्च व ल्युपिन कंपनी फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने 500 डस्टबिनचे ग्रामस्थांना वाटप.
  • कुळे गावात महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम.
  • शिवजयंती कार्यक्रमाकरिता व्याख्यानासाठी सौजन्य.
  • वडिलांच्या स्मरणार्थ कुळे गावातील गुढीपाडवा सप्ताह मधील ज्ञानेश्‍वरी पारायण करणाऱ्यांसाठी वस्त्रदान, सप्ताहामधील कीर्तन सौजन्य.
  • कुळे क्रिकेट के पी एल करिता खेळाडूंसाठी टी-शर्ट- 80 हजार रुपये (सलग दोन वर्षे उपक्रम).
  • बैलगाडा शर्यतीकरिता घोटवडे येथे बक्षीस स्वरूपात दुचाकी भेट.
  • करोनामध्ये गौड पोलीस स्टेशन व पिरंगुट पोलीस चौकी येथे सॅनिटायझरचे वाटप.
  • करोना काळात धान्य, औषधे यांचे वाटप केले.
  • मराठेवाडी ते शिंदे यांची खालील घरे पाइपलाइन – 3,00,000 (तीन लाख रुपये).
    (यापुढील काळात कुळे गावात 15 ते 20 लक्ष रुपयांची कामे करण्याचा मानस असून लवकरच
    ती प्रत्यक्ष अमलात आणली जातील.)

गावचा विकास, हाच ध्यास

  • कुळे गावातील वळकी नदीवरील बंधाऱ्याची दुरुस्ती – 18 लाख रुपये मंजूर करून बंधारा पूर्ण केला आहे.
  • कुळे स्मशानभूमी दुरुस्ती -6 लाख रुपये
  • यादववाडी-वारंगेवाडी रस्ता -5 लाख रुपये
  • यादववाडी-मानकरवस्ती रस्ता – 5 लाख रुपये
  • मानकरवाडी क्र. 2 रस्ता -2,97,264 रु.
  • भैरवनाथ मंदिरासमोरील कॉंक्रिटीकरण – 7 लाख रुपये
  • मराठेवाडी चौक कॉंक्रिटीकरण – 3 लाख रुपये
  • मराठेवाडी अंतर्गत रस्ता – 1.50 लाख रुपये
  • कुळे येथील पंचशील नगर समोरील रस्ता कॉंक्रिटीकरण – 5 लाख रुपयेमागील आळी भैरवनाथ मंदिराची मागची बाजू अंडरग्राउंड ड्रेनेज – 12 लाख रुपये
  • मागील आळी रस्ता कॉंक्रिटीकरण-5 लाख रुपये
  • कुळे माध्यमिक विद्यालय पहिल्या मजल्यावरील पत्रा शेड – 10 लाख रुपय
  • कुळे ग्रामपंचायत समोरील रस्ता कॉंक्रिटीकरण – 2,72,990 रुपये
  • ग्रामपंचायतवरील पत्राशेड – 3 लाख रुपये
  • पंचशील नगर ड्रेनेज लाईन – रु. 1.5 लाख
  • मराठेवाडी-साठेवाडी मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण – 40 लाख रुपये
  • यादववाडी सभामंडप – 5 लाख रुपये
  • पुढील आळी ते सोनार आळी रस्ता 3 लाख रु.
  • कुळे येथे सामाजिक सभागृह बांधणे – 5 लाख रुपये मंजूर

संकलन – सचिन केदारी, पाैड