‘आता ४० गद्दारांनी विचार करावा…’ ; तिकीट वाटपाच्या मुद्दावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aditya Thackeray on shinde group ।  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच महायुतीमध्ये ११ जागांचा पेच अजूनही कायम आहे. त्यातच भाजपमुळे शिंदे गटाच्या खासदारांचे तिकीट कापण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना भाजपाच्या दबावापुढे झुकावं लागत असल्याची टीका केलीय.त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी देखील यावर भाष्य करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “ज्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केलं अशांची तिकिटं कापण्यात आली”असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

या लोकांनी त्यांच्यासह जून मिळवलं काय? Aditya Thackeray on shinde group ।
“ज्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केलं होतं, त्यांचं तिकिट कापण्यात आलं. अजून काही लोक आहेत ज्यांची तिकिटं कापली जाणार आहे. मग या लोकांनी त्यांच्यासह (भाजपा) जाऊन मिळवलं तरी काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

४० गद्दारांनी विचार करावा… Aditya Thackeray on shinde group ।

पक्षासह गद्दारी केली, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्यावेळेस म्हणाले होते एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन असं तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले होते. तेच आता उमेदवारांना तिकिटही देऊ शकत नाहीत. हे हाल मिंधे गटाचे झाले आहेत. आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत नक्की काय होणार? कारण एक एकेकाची विकेट पडताना दिसू लागली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपा, मिंधे गट आणि राष्ट्रवादीची गद्दार गँग यांना उमेदवारच मिळत नाहीयेत. जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपा आणि मिंधे गटाला उमेदवारच मिळत नाहीत असं चित्र आहे.” अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

 हेही वाचा
महायुतीत महाभारत ! शिंदे गटाच्या चार खासदारांना झटका ; हेमंत पाटील, भावना गवळीनंतर ‘या दोन खासदारांचाही पत्ता कट होणार?