साहसी खेळासाठीची भारतातील ठिकाणे

भारताला समृद्ध आणि बहुविध संस्कृतीचा तसेच निसर्गाचा मोठा ठेवा मिळालेला आहे. अशा अनेक ठिकाणी आता साहसी खेळांच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या हृदयाची धडकन वाढवणारी आणि मनातील भितीवर मात करायला शिकवणारी तसेच अविस्मरणीय आठवणी देणारी ही ठिकाणे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी

१) लडाखमधील खारदुंगला येथे बाईकिंग – हिमालयातील अद्भुत सौंदर्य आपल्याला लडाखमध्ये पाहायला मिळते. अशा निसर्ग सुंदर वातावरणात मोटरसायकल वरून प्रवास करणे हे आनंददायी आणि चित्तथरारक ठरते. मात्र यासाठी गाईडेड टूर करणे योग्य ठरते. कारण हा प्रवास अतिशय आव्हानात्मक असतो. त्यामुळे तुमच्या बरोबर ग्रुप असणे किंवा प्रतिकूल परिस्थितीत मदतीच्या सुविधा असणे योग्य ठरते.

२) ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टटिंग – ऋषिकेश मध्ये गंगा नदी अतिशय खळखळत वाहते. अशा प्रवाहात खालीवर करत वेगाने रिव्हर राफ्टिंग करणे वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जाते. पुन्हा नंतर संध्याकाळी सुंदर सूर्यास्ताचे दर्शन घडते. रात्री तुम्ही जर का कॅम्प फायर केले तर नदीकाठी आणखी एक वेगळा आनंद घेता येतो. यासाठी आपण नावाजलेल्या कंपन्यांकडेच बुकिंग करावे. त्याखेरीज अनुभवी गाईड असावा.

३) कर्नाटकातील कुर्गमधील जीप सफारी – कुर्गचा परिसर अतिशय रमणीय आहे या ठिकाणच्या जंगलात आपल्याला असंख्य प्राणी नजरेस पडतात. त्यात खेरीज एरुकु येथील धबधबा, कॉफीचे मळे आणि परफेक्ट कॉफी कशी करायची याची सिक्रेट्स इथे मिळू शकतात. जाताना तुमच्याकडे कम्फर्टेबल शूज असायला हवेत आणि जबाबदार टूर ऑपरेटर असला तर तुम्हाला या ठिकाणच्या अनेक गोष्टींचे दर्शन घडू शकते.

४) गोव्यातील स्कुबा डायविंग – गोव्यातील नितळ पाण्यात समुद्री जीवनाचे नितांत सुंदर दर्शन घडते. ग्रँड आयलँड मरीन रिझर्व या ठिकाणी डायव्हिंगची सुविधा आहे. मात्र तुम्ही हे सर्व सुरक्षेला प्राधान्य देऊन करू शकता. त्यासाठी तुमच्यासोबत अनुभवी इन्स्ट्रक्टर असायला हवेत.

५) ऋषिकेश मध्ये बंजी जम्पिंग – तुमच्या हृदयाची धडधड वाढवणारी आणि अंतिमतः तुमच्या मनातून भीती पूर्णपणे घालवणारी भारतातील सर्वात मोठा बंजी जम्पिंगचा प्लॅटफॉर्म ऋषिकेश येथे आहे. हिमालयातील या सुंदर परिसरात तुम्ही फ्री फॉलचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी सुरक्षेबाबतचे चांगले रेकॉर्ड असणाऱ्या ऑपरेटरचीच निवड करा.

६) केरळ मधील मुन्नार येथील चहाच्या मळ्यातील ट्रेकिं – मुन्नार मधील खुणावणाऱ्या डोंगर रांगांना साद घालण्यासाठी सिद्ध व्हा. या ठिकाणी टी इस्टेट मधील हिरव्यागार रांगा आणि पर्वतराजीतील ट्रेक मनाला आनंद देतात. अनामुडी शिखरावरील ट्रेक हा दक्षिण भारतातील सर्वोच्च उंचीवरील ट्रेक आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला अतिशय निसर्गरम्य परिसर दिसतो. अर्थात तुमचे वयोमान आणि तंदुरुस्तीला पूरक ठरेल असाच ट्रेक निवडा. अनेकदा या ठिकाणी पाऊस आणि बदलणाऱ्या हवामानाचा सामना करावा लागतो.

७) उत्तराखंड मधील नैनिताल येथील पॅराग्लायडिंग – नैनिताल जवळील नैनी तलावावरून पॅराग्लाइडिंग करणे म्हणजे गरुडाप्रमाणे विहार करत खाली दिसणाऱ्या निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवत भरारी मारण्यासारखे असते. नवख्या पर्यटकांसाठी हा अतिशय आनंददायी आणि चित्तथरारक असा अनुभव असतो. अनुभवी पॅराग्लाइडर्स मात्र आणखी उंचीवर जाऊन नवी अनुभूती घेऊ शकतात. अर्थात त्यासाठी तुम्ही योग्य कंपनीचा आणि प्रमाणित इन्स्ट्रक्टर्सची निवड करणे आवश्यक असते. पॅराग्लाइडिंग करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हिताचे ठरते.

८) तमिळनाडूतील कोडाईकॅनाल येथे माउंटन बाईकिंग – कोडाई कॅनलच्या निसर्गरम्य परिसरात सायकल चालवण्याचा आनंद वेगळाच असतो. पाइनवृक्षांची जंगले, कोसळणारे धबधबे यांचा निवांतपणे आनंद घेत सायकलिंग करणे हा नवा अनुभव असतो. त्याखेरीज शहरात कोडाई लेकच्या भोवती सायकलिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी अगदी नवखी व्यक्ती देखील आरामात सायकलिंग करत फिरू शकते.

९) अंदमान आणि निकोबार येथे स्कुबा डायविंग – अंदमान आणि निकोबार येथील समुद्रकिनारे अतिशय नितळ आणि स्वच्छ आहे.त त्या ठिकाणी विविध जातीची आकर्षक प्रवाळे आणि समुद्र जीवन पाहायला मिळते. हॅवलॉक आयलँड हे डायव्हिंग साठी आणि साहसी जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.

१०) ऋषिकेश मध्ये कयाकिंग – जेव्हा गंगा नदीच्या प्रवाहातून कयाकिंग करतो तेव्हा नदीच्या प्रवाहाची ताकद आपल्याला कळते. काही ठिकाणी गंगा नदी शांतपणे वाहते तर काही ठिकाणी तिचा खळखळाट असतो. त्याचबरोबर कयाकिंग करताना आपल्याला नदीकिनाऱ्यावरील सुंदर घाट आणि मंदिरे यांचे दर्शन घडत राहते.