पुणे | एएफएमसीच्या अधिष्ठातापदी मे. जनरल गिरीराज सिंह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’च्या (एएफएमसी) धिष्ठातापदी मेजर जनरल गिरीराज सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांची उपकमांडट म्हणूनही नियुक्ती झाली आहे.

सिंह हे एएफएमसीच्या १९८९ बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी वैद्यकशास्त्रतील एम.डी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते रेडिओ डायग्नोसिसमध्ये डीएनबी आहेत आणि त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली येथून क्रॉस-सेक्शनल इमेजिंगमध्ये फेलोशिप मिळाली आहे.

त्यांना संशोधन, क्लिनिकल आणि प्रशासकीय अनुभव आहे. सिएरा लिओनमधील युनायटेड नेशन्स मिशन यासह भारतीय सैन्याच्या विविध रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख आणि सल्लागार (रेडिओलॉजी) यासह प्रतिष्ठित पदावर कार्य केले आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ते पदव्युत्तर वर्गासाठी परीक्षक म्हणून गेले आहेत. इंडियन रेडिओलॉजीकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या “टीचर्स विंग” चे ते राष्ट्रीय समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळातील विशेषज्ज्ञ मंडळाचे सदस्य देखील आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना सन २०११ मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून सन्मानित कर्ण्यात आले. या नियुक्तीपूर्वी ते आग्रा येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जनरल अॉफिसर म्हणून कार्यरत होते.