“गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार..” अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचं ट्विट चर्चेत

Eknath Khadse : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. यातच काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आज त्यांचा भाजप प्रवेश पार पडला. त्यानंतर आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. ज्यामध्ये पूर्वोचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात असलेल्या एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यानंतर खडसे यांनी याबाबत केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. | Eknath khadase after ashok chavhan

चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील याबाबत भाष्य केलं होत. | Eknath khadase after ashok chavhan

अशात स्वतः एकनाथ खडसे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”गेले काही दिवसापासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.”

काय म्हणाले होते गिरीश महाजन ?
एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही. मला वाटते तसे काही प्रयोजन नाही असं महाजन म्हणाले होते. | Eknath khadase after ashok chavhan

तसेच मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी. असा टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला होता.

SBI SCO Bharti : स्टेट बँकेत मॅनेजर आणि इतर पदांसाठी होणार भरती.. ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज.. असा करा ऑनलाईन अप्लाय

Rajyasabha Election : भाजपचे राजस्थानातील 2 उमेदवार जाहीर.. ‘या’ तारखेला होणार मतदान