‘कोण आला रे कोण आला कर्जत जामखेडचा वाघ आला’ आमदार राम शिंदेंचे कर्जतमध्ये जोरदार स्वागत

कर्जत (प्रतिनिधी) – विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर आमदार प्रा राम शिंदे यांचे कर्जत तालुक्यात भाजपाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तालुक्यातील सिद्धटेक येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. विविध ठिकाणी स्वागत करत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. राम शिंदे यांनी सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद व्यक्त केले.

राम शिंदे यांचे तालुक्यातील सिदधटेक, बारडगांव, राशीन अश्या अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले, कर्जत शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ राम शिंदेच्या विजयी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरीत आनंद व्यक्त केला.

कोण आला रे कोण आला कर्जत जामखेडचा वाघ आला ! भारतीय जनता पार्टीचा विजय असो ! राम शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! अश्या विजयी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शिंदे यांनी महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेतले. मिरवणूक शहरात दाखल झाल्यावर ठिकठिकाणी राम शिंदेचे जोरदार स्वागत करीत पदाधिकाऱ्यांनी आपले प्रेम व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदान याठिकाणी दोन मोठे भव्य फुलांच्या हारात राम शिंदेंना गुंफण्यात आले. ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांचे मंदिरात दर्शन घेऊन आरती करण्यात आली. विजयी मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर राम शिंदे चोंडीकडे रवाना झाले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, सरचिटणीस शेखर खरमरे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, शिवाजीराव अनभुले, ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ कांचन खेत्रे, तालुकाध्यक्षा आरती थोरात, माजी नगरसेविका राणी गदादे, आशाताई वाघ, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.