आज सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या 10 ग्रामचा दर

नवी दिल्ली  – जागतिक बाजारात आणि भारतीय बाजारात सध्या सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्याच्या उद्देशाने विक्री केल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला.

मात्र दीर्घ पल्ल्यात सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर कायम राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 250 रुपयांनी कमी होऊन 73,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 86,500 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर नफेखोरीमुळे 13 डॉलरने कमी होऊन 2,375 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. जागतिक बाजारात चांदीचा दर काही प्रमाणात वाढून 28.25 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.

अमेरिका व्याजदर कपातील उशीर करणार असल्यामुळे नफेखोरी होत असल्याचे दिसून येते. तर काही विश्लेषकांनी सांगितले की, इराण – इस्त्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.