स्वगृही परतल्यानंतर भगतसिंह कोश्यारी म्हणाले,”आदित्य ठाकरेवर मी आजही माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो”

नवी दिल्ली : भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याचीआधीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदाची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली आणि राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिली. कधी मुंबईविषयी तर कधी राज्यातील महापुरुषांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधाने केली. कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरुच होते. दरम्यान, राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच कोश्यारींनी आपल्या कारकिर्दीविषयी भाष्य केले आहे. यात त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंविषयीही मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका संकेतस्थळाला मुलाखत दिली. यात त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली होती याविषयी संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. ज्यावेळी राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात फूट पडली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करून शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही माहिती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोश्यारी यांची भेट घेऊन  दिली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर आजही आपण प्रेम करतो तो माझ्या मुलाप्रमाणे असल्याचे कोश्यारींनी म्हटले.

दरम्यान, सत्तास्थापनेच्या घटनेविषयी सांगताना कोश्यारी म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी मला दिली त्यावेळी मी त्यांना या संबंधीचे पत्र सादर करण्यास सांगितले. त्यावेळी तो तब्बल ३ तास फोन करत होता.परंतु, दिल्लीवरून कोणतेही पत्र आले नाही कि त्याच्या फोनला उत्तर देण्यात आले नाही. बिचारा नाराज होऊन तिथून निघून गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुम्ही विचार करा त्याला किती वाईट वाटले असेल. असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना कोश्यारी यांनी,एक “सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यास सांगितले असता येण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला. मग मी त्यांना यायचं नसेल तर किमान पत्र तरी द्या त्याचा आपण स्वीकार करू असे म्हटले असता हे पत्र तयार करण्यासाठी त्यांनी  तब्बल ३  तास लावले अशी माहिती कोश्यारी यांनी म्हटले.  पुढे त्यांनी ‘एवढेच नाही तर सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सेनापतीचाच चेहरा पुढे केला, तसेच त्यांनी असल्याचे सांगितले.