“पुन्हा शिर्डीतून खासदार लोखंडेच..” अस्पष्टरित्या केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंची कबुली ?

नेवासा ( राजेंद्र वाघमारे ) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे माझे मित्र असून माझ्या राज्यसभेच्या खासदारकीचे दोन वर्ष अजून बाकी आहेत. माझी या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे मात्र तसा काही निर्णय झालेला नसल्याचे दस्तुरखुद्द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष व केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधतांना म्हटले. तसेच यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत शिर्डी मतदार संघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हेच असतील? असे अस्पष्टरित्या आठवले यांनीच भाकित केलं. त्यामुळे आगामी निवडणूकीत सेना-भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार लोखंडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

लोकसभेबाबतचा राजकीय पक्षांकडून जागा वाटपाचा तिढा अद्यापही संपुष्ठात आलेला नसल्यामुळे शिर्डी मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे इच्छुक नेतेमंडळी या मतदार संघातून उमेदवारीचा दावा करतांना दिसत दिसून येत आहेत. तर रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची अनेकदा इच्छा व्यक्त केलेली होती.

मात्र काल-परवा शिर्डी येथे पत्रकारांशी बोलतांना आठवलेंनी या निवडणूतील तिढा स्पष्ट करुन याचा उलगडा केल्यामुळे या मतदार संघातून तिसऱ्यांदा आता सदाशिव लोखंडे हेच लोकसभा निवडणूकीचे उमेदवार असतील असे अस्पष्टरित्या स्पष्ट केल्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.