दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांमध्ये बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरु

Ahmedabad Bomb Threat । काही दिवसापूर्वी दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, आता दिल्लीनंतर अहमदाबादच्या काही शाळांना बॉम्बब्लास्टची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी 
अहमदाबादमधील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.

पोलिसांकडून धमकीच्या मेलची चौकशी  Ahmedabad Bomb Threat ।

गुजरातमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील विविध शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागातील शाळांना धमकीचे मेल आले आहेत. पोलीस धमकीच्या मेलची चौकशी करत आहेत. रशियन मेल आयडीवरून ही धमकी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या शाळांमध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे कारण नाही. अनेक शाळांमध्ये शोधमोहीम पूर्ण झाली आहे. पोलीस सतर्कतेवर काम करत आहेत.

परदेशी डोमेनचा वापर  Ahmedabad Bomb Threat ।
ज्या शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे त्यात बोपल येथील डीपीएस, आनंद निकेतनसह सुमारे 6-7 शाळांचा समावेश आहे. अहमदाबादमधील शाळांना पाठवलेले ईमेल दिल्लीच्या धर्तीवर आहेत. ज्या डोमेनवरून ईमेल पाठवला गेला आहे ते देशाबाहेरचे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, शाळांना सुट्या असल्याने मुलांच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. मात्र उद्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान असल्याने पोलीस सतर्कतेच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा
दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, तपास यंत्रणा अलर्ट